आष्टी ते मुलचेरा मार्गांवर मधोमध कोसळले भलेमोठे झाड.
वाहतुकीसाठी मार्ग बंद
आष्टी दिनांक:- 03/09/2023 आज झालेल्या वादळी पाऊसामुळे आष्टी मुलचेरा मुख्य मार्गावर भलेमोठे झाड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या परंतु ॲम्बुलन्स मध्ये संकट काळात अटकलेल्या पेंशन्टला मार्ग काढण्यासाठी वन विभागाला फोन करण्यात आला परंतु वन विभागाचे कर्मचारी यांनी फोन उचलायला तयार नव्हते शेवटी टायगर ग्रुप ला १०८ च्या डॉयव्हर ने कॉल करुन बोलावले. टायगर ग्रुप ने स्वता ॲम्ब्युलन्स त्या ठिकानी नेऊन त्या पेंशन्टला रुग्णालयात नेण्यास मदत केली.रस्त्यात अडकून पडलेल्या प्रवाशांनी हे झाड रस्त्याला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. झाडाच्या फांद्या तोडून कार व दुचाकी जाण्यापूरता रस्ता सुरळीत करण्यात आला. मात्र हे मोठे झाड पूर्णपणे रस्त्यावर असल्याने इतर वाहनांसाठी हा मार्ग बंदच आहे. जिल्ह्यात आज पाऊसाने वादळासह हजेरी लावली. मार्कडा कंसोबा जवळील वनविभागाच्या नाक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हे झाड कोसळले त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला.

