तु त्या काठावर , मी या काठावर अशी आहे परिस्थिती निमलगुडम गावातील नागरिकांची
गावातून मध्यावर वाहतोय नाला, चार महिने करावी लागते कसरत
अहेरी:-
अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत तिमरम(गुड्डीगुडम)अंतर्गत येत असलेल्या निमलगुडम गावात मध्यस्थी नाला असून अर्धा गाव त्यापली कडे तर अर्धा गाव या पली कडे वसलेले आहे.करिता नाल्यावर पुल बनविण्याचे मागणी गाववासीय करीत आहेत.
१९७८ साली वसलेला निमलगुडम जेमतेम २०० लोकसंख्या असलेले लहानसा गाव असून ५० घराची वस्ती आहे.आलापली- सिरोंचा महामार्गालगत गाव असून गावाच्या मध्यभागातुन एक छोटासा नाला वाहतो पावसाळ्यात हा नाला तुडूंब भरून वाहतो आणि काही घरांना पूरपरिस्थिती निर्माणही होतो.अश्यावेळी पलीकडील नागरिकाचे काही काळापुरता गावा पासून संपर्क तुटतो आणि शालेय विध्यार्थी, अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना शाळेपासून व सकस आहरापासून मुकावे लागते तसेच जीवनावश्यक वस्तू सुद्धा मिळणे दुरापास्त होते. अतिवृष्टी झाल्यास दोन त तीन दिवस हा नाला तुडुंब भरून वाहत असतो.
ग्राम पंचायत वतीने पुल बांधकाम करण्यास निधी अपुरा पडत असल्याचे ग्राम पंचायत चे अधिकाऱ्यांनी सांगितले असून अनेकदा आमदार, जिल्हा परिषद कडे पुल निर्मितीसाठी मागणी करून या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
देश स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. आज ही अनेक गावामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य उपलब्ध नसून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
निमलगुडम गावाच्या मध्य भागातून जाणारा नाला भरून वाहत असताना वाहत्या पाण्यातुन नागरिक व लहान बालके ये-जा करीत असतात अश्या वेळी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता या नाल्यावर पुल बांधकाम करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष केंद्रित करून शासनाच्या कुठल्याही निधीतून या नाल्यावर पुल बांधकाम करण्याची मागणी नागेश शिरलावार, आनंदराव कोडापे, साईनाथ मडावी, राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, सतीश आत्राम, अक्षय सडमेक, विजय मडावी,प्रमोद बामनकर,जयश्री आत्राम, लक्ष्मी सडमेक,रंजना गजेंद्र, पूजा पेंदाम सह गावातील नागरिक करीत आहेत.

