श्री सदगुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
आष्टी:-
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 8/09/ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रा से यो प्रमुख डॉ रमेश सोनटक्के वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ अपर्णा मारगोनवार डॉ एम पी सिंग डॉ दीपक नागापुरे प्रा सुबोध साखरे हे मंचावर उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ अपर्णा मार्गोनवार यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आयोजनाची भूमिका व रा से यो स्वयंसेवकांची जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ एम पी सिंग यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे असे सांगितले तर डॉ दीपक नागापुरे यांनी विद्यार्थ्यांनी साक्षर होण्यापेक्षा सुशिक्षित होणे गरजेचे आहे विद्यार्थी जर सुशिक्षित झाला तर समाजाला सुशिक्षित करण्या चे पवित्र कार्य त्याच्या हातून घडू शकते असे विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रमेश सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रा से यो विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातील निरक्षणांना साक्षर करण्याचा कार्य व समाजामध्ये असलेले अज्ञान व अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षित करण्याचा कार्य रा से यो स्वयंसेवकांनी करावे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सचिन मुरकुटे डॉ प्रदीप कश्यप डॉ सोनाली धवस डॉ दीपक नागापुर डॉ प्रकाश राठोड प्रा सुबोध साखरे प्रा महेश शिल्लमवार प्रा जया रोकडे प्रा राहुलआवारी प्रा कवींद्र साखरे कुमारी शुभांगी डोंगरे अविनाश जीवतोडे विजय खोब्रागडे सविता गारघाटे संदीप मानापुरे रवींद्र झाडे रमेश वागदरकर श्रीमती उषा माहूरपवार श्रीमती पौर्णिमा गोहने आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

