हत्त्यांच्या हल्यात वडसा वनविभागाचा वाहन चालक ठार
पळसगाव डोंगरगाव डांबरीकरण रस्तेवरील घटना
दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना
गडचिरोली:-
जंगली हत्तींना रोडलगत पहात असताना हत्तीला रोडलगत उभे राहून पहात असताना हत्तीने केला हमला व वनविभागाच्या चालकाचा घेतला जीव .
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील मंजेवाडा शंकरनगर पाथरगोटा भगवानपूर या भागात गेल्या काही दिवसापासून ओडिशा राज्यातील हत्तीचा कळप छत्तीसगड राज्यमार्गे धानोरा कोरची कुरखेडा तालुक्यातील ऊराडी आरमोरी तालुक्यातील कुलकुली मानापुर परत देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव चिखली परत कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर त्यानंतर दिनांक 8 सप्टेंबर पासून आरमोरी तालुक्यातील पळसगाव पाथरगोटा शंकर नगर मजेवाडा परिसरात हत्यांचा कळप वास्तव्यास असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान व इतर पिकांचे व साहित्यांचे नासधूच करून सर्वात जास्त शंकरनगर मजेवाडा येथील दोनशे शेतकऱ्यांची मोठी नुकसान केली असल्याने आज दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शंकर नगर येथील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी जंगली हत्तींचे कळप हाकलून लावण्यासाठी जात असताना शंकर नगर येथील एक शेतकरी विश्वजीत परीमल मंडल वय 36 धावत असताना झाडाला आदळल्याने दुखापत झाल्याने वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व वनपरिक्षेत्र एफडिसिएम देसाईगंज विभाचे अधिकारी यांनी साहानुभुती दाखवून दुखापत झालेल्या शेतकऱ्याला स्वतः उचलून आपल्या वनविभागाच्या गाडीने आणून त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ही घटना जात असतानाच आज अजुन जंगली हत्ती शंकर नगर वरुण पाथरगोटा जंगलत शेतीची रात्रो नुकसान करुन आज दोन ते तिनच्चा दरम्यान पळसगाव डोंगरगाव मध्योमध डांबरी करण रस्त्यालगत बाजूला बसले होते परंतु चार वाजताच्या सुमारास रस्त्यावर अचानक येऊन नागरीकांवर धावले असता सहाय्यक वनसरक्षक यांच्या गाडीचे वाहन चालक रस्त्यावरचे हत्ती पाहताना सुधाकर बाबुराव आत्राम वय ४५ यांच्या वर जंगली हत्यानी धाऊन हल्ला करुन ठार केले.
ते आताच गेल्या मार्च महिन्यात चद्रपुर येथुन बदली होऊन वडसा वनविभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होते शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालय देसाईगंज येथे नेण्यात आले आहे असता जंगली हत्ती त्याच परीसरात आहे
घटना स्थळी सहाय्यक वनसंरक्षक भारती वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम क्षेत्र सहाय्यक किनेकर सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम वनरंक्षक अतकरे वनरंक्षक शिऊरकर यासह वनविभाचे कर्मचारी उपस्थित होते