ट्रक भरून दारुसह 25,00,000/- लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
 ट्रक भरून दारुसह 25,00,000/- लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त



अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९


 गडचिरोली:-
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक केली जाते त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 16/09/2023 रोजी दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरासदार व पोलीस कुमक यांनी सापळा रचून आरोपी नामे कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याचे ताब्यातुन अशोक लेलँड कंपनीची दहा चाकी माल वाहतुक ट्रक क्र. एम. एच. 40 सी. डी. 3530 किंमत अंदाजे 15,00,000/- लाख रु. ( अक्षरी पंधरा लाख रुपये) व रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे 270 बॉक्स किंमत अंदाजे 10,00,000/- लाख रु. ( अक्षरी दहा लाख रुपये) असा एकुण 25,00,000/- लाख रु. ( अक्षरी पंचवीस लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीवर उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हाचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. संगमेश्वर बिराजदार हे करत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरासदार,पोउपनि पुजा गव्हाणे, पोउपनि ज्ञानेश्वर कोल्हे, पोउपनि आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. तसेच यावेळी पोलीस अधीक्षक श नीलोत्पल यांनी जिल्हातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्हात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !