गडचिरोली पोलिसांनी जप्त केली चार चाकी वाहनासह ८ लाख २४ हजारांची अवैध दारू
गडचिरोली:-
जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते त्याविरुध्द गडचिरोली चे एसपी निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे, उप-पोस्ट, पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
प्राप्त माहिती नुसार आज पहाटे गडचिरोली शहरात अवैध दारु येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे मुल रोडवर शोध घेत असतांना सदर संशयित वाहन सेमाना बायपास मार्गे पोटेगाव रोड व तिथुन चातगावकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता, वाहनात असलेले २ अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सदर वाहनाची किंमत ५ लाख रुपये, व त्या वाहनात विदेशी दारु व बियर किंमत ३,२४,००० रुपये असा एकुण ८,२४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्या बाबत पोलीस स्टेशन
गडचिरोली येथे १) आकाश भरडकर, २) निखील मंडलवार, ४) निरज मंडलवार तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध कलम ६५ (अ), ८३, ९८ (२) महा. दा. का. सह कलम ३५३, ३३२ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्हातील पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक आव्हाड करीत आहेत.

