पोलीस स्टेशन नागभीड येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा

0
पोलीस स्टेशन नागभीड येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी


नागभिड---:
भारत स्काउट आणि गाईड कर्मवीर विद्यालय नागभीड येथील राजमाता जिजाऊ गाईड युनिट व छत्रपती शिवाजी महाराज स्काउट युनिट यांच्या वतीने व झेप निसर्ग संस्था नागभीड च्या सहकार्याने पोलीस स्टेशन नागभीड येथे राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
    राजमाता जिजाऊ गाईड युनिट व छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट कर्मवीर विद्यालय नागभीड यांच्या पुढाकाराने व विद्यालयाचे प्राचार्य .देविदास चिलबुले तथा पर्यवेक्षक .युवराज ईडपाचे व स्काउट मास्तर .किशोर नरुले तथा गाईड कँप्टन कु.रजनी चिलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची सेवा करणारे महाराष्ट्र पोलीस व निसर्गाचे रक्षण करणारे झेप निसर्ग संस्था तसेच सापाचे रक्षण करणारे सर्पमित्र यांना रक्षासुत्रामध्ये बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना नागभीड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आकाशकुमार साखरे यांनी आजपर्यंत आम्ही नागभीड येथील जनतेचे रक्षण करीत आलेलो आहोत ते आमचे कर्तव्य आहे याही पुढे चांगल्या पद्धतीने नागभीडच्या जनतेचे रक्षण करू असे वचन दिले. सोबतच झेप निसर्ग संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे यांनी निसर्गा विषयीचा समतोल निसर्गामध्ये सापाचे महत्त्व याविषयी अधिक माहिती दिली व निसर्गाचे संवर्धन व रक्षण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करणारे गाईड पथक आणि स्काऊट पथक या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस उप निरिक्षक दौलत बारसागडे ,सौ.आरती गेडाम, हनवते, .कुणाल पतरंगे,कु. करिश्मा भांडे व ईतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते तर झेप निसर्ग संस्थेचे गुलाब राऊत , विक्रांत गजपुरे, क्षितिज गरमळे , रितेश गोरे ,रोशन आटमांडे ,मिलिंद ठाकरे यांना राखी बांधुन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर कर्मवीर विद्यालय नागभीड येथील सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक वृंदाला राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी कर्मवीर विद्यालय चे प्रा, वाघधरे , प्रा मुनघाटे ,प्रा दिघोरे प्रा, रेवस्कर सौ. कुंदा गिरडे कु.कायरकर प्रा गजपुरे, प्रा, खोब्रागडे प्रा, नवघडे व ईतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन गाईड लिडर कु. होलिका किशोर नरुले हिने केले तर आभार गाईड लिडर कु. श्रेया विनोद निशाने हिने मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !