आ. बंटी भांगडिया यांच्या रक्षाबंधन सोहळ्यास तालुक्यातील महिलांची तुफान गर्दी

0
आ. बंटी भांगडिया यांच्या रक्षाबंधन सोहळ्यास तालुक्यातील महिलांची तुफान गर्दी



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड---:
चिमूर विधानसभेत जनसामान्यांचा आवाज व विकास पुरुष म्हणून प्रख्यात असलेले विधानसभेचे लोकप्रिय आमदार ज्याप्रमाणे विकास कामासाठी ओळखले जातात त्याचप्रमाणे विधासभेतील महिलांमध्ये आपला हक्काचा भाऊ म्हणून स्थान मिळविले आहे.मग जन्मास येणाऱ्या मुलीस भविष्यासाठी रोखे वाटप, विध्यार्थाना शिक्षणासाठी मदत, रुग्णाला उपचारासाठी मदत, किंवा मुलीच्या लग्नासाठी मदत म्हणून खाद्य तेल वाटप असो, आमदार बंटी भांगडिया आपल्या क्षेत्रात विरोधकांना न जुमानता  नेहमीच खंबीर असतात.दरवर्षी प्रमाणे आज नागभीड तालुक्यात महिला आघाडी च्या वतीने व आमदार किर्ती कुमार भांगडीया यांनी आपल्या भगिनी साठी रक्षाबंधन सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेला होता.तालुक्यात महिलांना आणण्यासाठी एकही गाडी न पाठवता फक्त प्रेमापोटी तालुक्यातून  महिलानी प्रचंड अशी गर्दी केली. ज्यामुळे कार्यकर्त्यांना  तारेवरची कसरत करावी लागली.
रक्षाबंधन कार्यक्रमाला सुरवातीला प्रमुख अतिथी  म्हणून लाभलेल्या मान. चित्राताई वाघ प्रदेशाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र आणि मा. आमदार बंटी भांगडिया यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून व दीप प्रज्वलन  करून अभिवादन केले. त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने  मान्यवरांचे पुष्पहार घालून व स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याक्षणी महिलांशी संवाद साधताना  आमदार बंटी भांगडिया, पत्नी सौ.अर्पणा भांगडिया, मातोश्री सौ.मेघाताई  भांगडिया यांनी आजपर्यंत मिळालेल्या प्रेमाबंद्दल आभार व्यक्त करीत नतमस्तक होऊन अभिवादन केले आणि आमदार असो किंवा नसो मी आपल्या भगीनिंसाठी सदैव खंभीर पणे उभा राहीन असा शब्द दिला ,तर मान.चित्रा वाघ यांनी महिलांच्या वतीने सर्व भगीचे आपल्यावर असेच आशीर्वाद राहतील याची ग्वाही दिली.आलेल्या भगिनींनी आमदार महोदय यांना राखी बांधून आपले शुभाशीर्वाद दिले.तर भावानी आपल्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून    साडी भेट दिली.
या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर तेलंगाना जिल्हा प्रमुख मा.एस. श्रीनिवासन, मा.हरीश बापू पल्लई,ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष चिमूर राजू भाऊ देवतळे,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुकाध्यक्ष संतोष रडके,बाजार समिती सभापती आवेश पठाण, तालुका समन्वय अध्यक्ष सचिन आकुलवार,महिला आघाडी अध्यक्ष मायाताई नन्नावरे,महिला आघाडी अध्यक्ष नागभीड इंदुताई आंबोरकर, माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे,भाजयुमो अध्यक्ष देवानंद बावनकर,ओबीसी आघाडी अध्यक्ष रामदास बहेकर, शहर अध्यक्ष म.आ.नितू ताई येरणे,भाजयुमो शहर अध्यक्ष हेमंत नन्नावरे,माजी नगरसेवक शिरीष वानखेडे,मा.नगरसेवक दशरथ उके,मा.नगरसेवक रुपेश गायकवाड,मा.नगरसेवक दुर्गा चीलबुले,मा.नगरसेवक अर्चना मरकाम,जि.प.प्रमुख राजेश घीये,जि.प.प्रमुख रमेश बोरकर, जि.प.प्र.अरविंद भुते, जि.प.प्र. धनराज बावनकर,जहांगीर कुरेशी, धनराज काटेखाये,राहुल कुंभरे,राकेश बावणे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्खेनी  उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !