ब्रेकिंग न्यूज वयोवृद्ध ईसमाचा गळा चिरुन खुन

0
ब्रेकिंग न्यूज
 वयोवृद्ध ईसमाचा गळा चिरुन खुन 


चंद्रपूर :- 
गळा कापून वयोवृद्ध माणसाचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर शहरातील गोल बाजार परिसरातील टिळक मैदानात सकाळच्या वेळेस उघडकीस आली. या घटनेनव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, मृतकाचे नाव मधुकर मंधेवार (70) असे असून तो शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी आहे.
गोलबाजार परिसरात भीक मागून जगणारा मधुकर मंधेवार याचा आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी पहाटे गळा चिरुन हत्या झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.नागरिकांनी घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस सोबतच अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत असे वरिष्ठ पोलीस अधिकारी ही घटनास्थळी पोहचत घटनेची माहिती घेतली.मृतदेह शवविच्छेदन करिता चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीतआहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !