वाघाला पळवून लावत हिमतीने वाचविला स्वतःचा जीव.
गडचिरोली
दिनांक:- 18/08/2023 वाघ समोर दिसताच माणसाला घाबरगुंडी सुटत असते मात्र वाघाने हल्ला करताच त्याच्याशी दोन हात करून स्वतः चा जीव वाचवित त्याला पळवून लावण्याची हिम्मत दाखविली ती कासवी येथील 49 वर्षीय गुराखी रवींद्र पुसाम याने.
17 ऑगस्ट दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रवींद्र पूसाम हा कासवी लगतच्या पळसगाव जंगलात गुरे चारण्यासाठी नेले होते. दुपारी तीन वाजताच्या झुडपात दडून बसलेला वाघ समोर आला व त्याच्यावर हल्ला केला रविंद्रने न घाबरता खाली पडताच हातातली कुऱ्हाड भिरकावली व वाघ काही फूट अंतरावर फेकला गेला. वाघाने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पण मोठ्या हिमतीने त्याचा प्रतिकार करत हातातील काठी भिरकावली व वाघ पळून गेला. अणि रविंद्र ने साहस दाखवत वाघाची शिकार होण्यापासून स्वतःला बचावले. यात रविंद्र हा जखमी झाला असून त्याच्या पाठीवर जखम झाली आहे. या घटनेची माहिती कळताच आरमोरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रविंद्र पुसाम यांची भेट घेऊन त्याला आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविंद्रने दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

