BIG BREAKING गडचिरोली व छत्तीसगड पोलीस दलाने नक्षल शिबिरातून स्फोटके व साहित्य केले जप्त

0
BIG BREAKING गडचिरोली व  छत्तीसगड पोलीस दलाने नक्षल शिबिरातून स्फोटके  व साहित्य केले जप्त 

.
गडचिरोली, १७ ऑगस्ट २०२३ :: -
 छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टनम पोलीस ठाण्यांतर्गत दम्मूर- बागुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी दबा धरून बसले होते. नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटके आणि अन्य नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, दम्मूर- बारेगुडाच्या जंगलात छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरिया कमिटीचे २० ते २५ नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी १६ ऑगस्टला भोपालपट्टनम पोलिसांचे डीआरजी दल आणि गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलीस ठाण्यातील सी-६० पथकाचे जवान संयुक्तरित्या जंगलात पाठविण्यात आले. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे स्फोटके, डिटोनेटर, जिलेटीन, नक्षल्यांचे पिट्टू, जीवनावश्यक वापराचे साहित्य आणि पुस्तके आढळून आली. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !