श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात नव मतदार जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन

0

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात नव मतदार जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन


श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत दिनांक 30/08/ 2023 ला भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या नव मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी के सिंग हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर तहसील कार्यालय चामोर्शी येथील नायब तहसीलदार श्री एस आर कावळे श्री व्ही एन ढोरे मंडळ अधिकारी आष्टी श्री एन एस अतकरे मंडळ अधिकारी येणापूर सहाय्यक श्री सचिन गुरनुले तलाठी आष्टी श्री चंदन महिंद्रे तलाठी आष्टी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रमेश सोनटक्के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून नव मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रमात विषयीची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली तर श्री एस एन आतकरे मंडळ अधिकारी येनापुर यांनी भारत सरकारने राबविलेल्या नव मतदार नोंदणी अभियान मध्ये महाविद्यालयातील व आपल्या परिवारातील व्यक्तींचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून त्याला आधार कार्ड व रहिवासी दाखला जोडून मतदार यादी मध्ये नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आणि मतदानाचे महत्त्व व अधिकार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी के सिंग यांनी भारतीय संविधानाने मिळालेल्या अधिकाराचा वापर सर्व विद्यार्थ्यांनी मतदार यादी मध्ये नाव नोंदवून मतदानाचा अधिकार बजवावा व आपल्या पसंतीचा योग्य उमेदवार जो आपल्यासाठी व समाजासाठी काम करेल अशाच उमेदाराला निवडून देण्याचे आवाहन सुद्धा प्राचार्यांनी केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा सुबोध साखरे रा से यो सहकार्यक्रम अधिकारी यांनी केले या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 6 वाटप करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अपर्णा मारगोनवार डॉ एम पी सिंग डॉ सोनाली धवस डॉ दीपक नागापुरे डॉ प्रकाश राठोड प्रा महेश शिल्लमवार प्रा सुबोध साखरे प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा राहुल आवारी प्रा कवींद्र साखरे कुमारी सविता गारगाटे संदीप मानापुरे रवींद्र झाडे अविनाश जीवतोडे विजय खोब्रागडे कुमारी शुभांगी डोंगरे रमेश वागदरकर श्रीमती उषा माहूरपवार श्रीमती पौर्णिमा गोहने व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !