आष्टी पोलीसांनी पुन्हा पकडली तस्कराकडून लाखो रुपयांची अवैध दारू

0
आष्टी पोलीसांनी पुन्हा पकडली तस्कराकडून लाखो रुपयांची अवैध  दारू


अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-

आष्टी पोलीसांनी पुन्हा पकडली तस्कराकडून लाखो रुपयांची दारू .देशी विदेशी दारू सह ११२२००० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  गडचिरोली जिल्ह्यातील दारू बंदी असल्याने शेजारील असलेल्या जिल्ह्यातील  अवैध देशी विदेशी दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे हिच बाब लक्षात घेऊन दिनांक ३१/०८/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोस्टे आष्टी यांचे बातमीवरून पोउपनि पवार, जंगले  सा सफौ/ काळे,  पोहवा करमे पोशि-नागुलवार, पोशि-तोडासे, पोशि गोडबोले, पोशि-रायशिडाम, पोशि-पंचफुलीवार असे मौजा मार्कडा कंसोबा फाटा येथे नाकाबंदी करीत असताना सदर पोलीस पथकाने बोलेरो पिकअप वाहन क्र- एम एच ३० ए.बी २६०२ या वाहनास थांबविण्याचा ईशारा दिला परंतु वाहनाच्या चालकांनी वाहन न थांबविता आलापल्ली रोडनी वेगाने निघुन गेले. त्यानंतर  पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला असता बोलेरो पिकअप क्र- एम एच ३० ए.बी २६०२ च्या चालकांनी मौजा चंदनखेडी (वन) येथील रस्त्यावर वाहन उभी जंगलाचा फायदा घेऊन करुन पळुन गेला. तेव्हा पोलीसांनी सदर वाहन चेक केले असता त्यामध्ये  ९० एम एल मापाचे ५५ सिलंबद बॉक्स किंमत ५,५०,०००/- रु ३७५ एम एल मापाचे विदेशी दारू ०५ सिलबंद बॉक्स किंमत ७२,०००/- रु  व बोलरो मॅक्सी गाडी बनावट क्रमांक एम एच ३० ए.बी २६०२ किमत ५,०००००/-रु असा एकुण ११,२२,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयात जप्त केलेले वाहन क्रमांक हे बनावटीकरणा असल्याचे व अज्ञात चालक हा जंगलाचा फायदा घेवून फरार झाल्याची पोलीसाकडुन माहीती असुन आष्टी पोलीसांनी सदर अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमान्वये  गुन्हा दाखल केला आहे  पुढील तपास पोउपनि/मानकर  करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !