तरुण दोन व्यापाऱ्यांची हत्या करुन फेकले नदीत

0
 तरुण दोन व्यापाऱ्यांची हत्या करुन फेकले नदीत 


नागपूर :

 नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. ही हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले होते. ते बाहेर काढण्यात आले असून या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



काय घडले नेमके ? 

नागपूरमधील दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर दोन्ही व्यापारी बेपत्ता असल्याची तक्रार बर्डी आणि सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. यानंतर दोन्ही व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. या दोघांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणच्या नदी पात्रातून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

उधारी देणं शक्य नसल्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दोन तरुण व्यापाऱ्यांच्या हत्येमुळे नागपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !