चार ट्रक व एक पिकअप मधून अवैधरित्या कत्तली करीता १०४ गोवंश तस्करी करणाऱ्यांना आष्टी पोलीसांनी केले जेरबंद

0
चार ट्रक व एक पिकअप मधून अवैधरित्या कत्तली करीता १०४ गोवंश तस्करी  करणाऱ्यांना आष्टी पोलीसांनी केले जेरबंद



१०४ गोवंशाची केली मरणाच्या दारातून सुटका


 ५८ लाख रुपयाचा मुद्देमाल व पाच आरोपी ताब्यात अशी आष्टी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-

 पोलीस अधिक्षक  निलोत्पल सा. यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणा-या व्यक्तीवर आष्टी पोलीस स्टेशन च्या माध्यमातुन कारवाई करण्यात येत असुन त्याअनुषंगाने दिनांक २७/०७/२०२३ रोजी गोपनिय माहीतीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, चार आयसर ट्रक व एक पिकअप वाहना मध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीनें भरून तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवुन जाणार असल्याची माहीती पोलीस निरीक्षक कुदंन गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करून चार आयसर  ट्रक व एक पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांचा चार ते पाच किलो मिटर अंतर पाठलाग करून पकडण्यात आले आहे.

सदर कारवाईत एकुण ५८,००,०००/- रू. (अठ्ठावन लाख रू.) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये ०४ आयसर ट्रक व ०१ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत १ ) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन शेख ३) शेख आशीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखकर गाधाम या आरोपींताना ताब्यात घेण्यात आले असुन इतर ३ असे एकुण ८ आरोपींवर आष्टी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रं. १८७/२०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५ (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम ३,११ (ड) प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९ महा. पोलीस अधिनियम १९५१ तसेच सहकलम १३० / १७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोउपनि अजयकुमार राठोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  निलोत्पल , अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) अनुज तारे , अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन)  कुमार चिंता ,अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड , यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुदंन गावडे, पोउपनि अजय राठेड, गणेश जंगले, श्रेणी पोउपनि येनगटीवार,सफी/ देवतळे, पोहवा / ४०७ मडावी, पोना / ३३१९ जाधव, पोना / ५१७७ सुरवाडे, पोशि/ ३३९५ नागुलवार,पोशि/ ५६६१ रायसिडाम, पोशि/ ४१५४ पोतराजे, पोशि/ ५६७५ मेदांळे यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !