रुपालीने विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

0
रुपालीने विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या 


अशोक खंडारे मुख्य संपादक

कूरखेडा -
  तालूक्यातील कढोली नजीक असलेल्या वासी येथील एका महाविद्यालयीन तरूणीने गावातीलच घरा जवळ असलेल्या सार्वजनिक विहीरीत आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार रोजी पहाटेचा सूमारास घडली मृतक विद्यार्थीनीचे नाव रूपाली गोपाल लटये वय २० असे आहे
    सदर बाब आज दूपारी ११ वाजताच्या सूमारास गावकऱ्यांना निदर्शनात येताच कूरखेडा पोलीस स्टेशन येथे सूचना देण्यात आली पोलीसांनी घटणास्थळ गाठत गावकऱ्यांच्या मदतीने तिला गळ व खाटेचा मदतीने विहीरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे आणले मृतक विद्यार्थीनी ही काल रात्री पासूनच घरून बेपत्ता होती रात्री कूटूंबियानी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही पहाटे तिने विहीरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे ती डि के महिला महाविद्यालय  कूरखेडा येथे होम सायन्स द्वितीय वर्षाला शिकत होती अशी माहिती आहे मात्र तिने आत्महत्या का केली याबाबद नेमकी माहिती मीळू शकली नाही घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !