पतीने हातोड्याने प्रहार करून पत्नीचा केला खून

0
 पतीने हातोड्याने प्रहार करून 
पत्नीचा केला खून


नागपूर:-

 चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे
ही धकादायक घटना नागपूर शहरातील नंदनवन झोपडपट्टी परिसरात घडली असल्याची माहिती आहे. ही घटना घडली तेव्हा दाम्पत्याच्या दोन्ही मुली घरामध्ये उपस्थित होत्या अशी माहिती आहे. नंदनवन झोपडपट्टी परिसरामध्ये रमेश भारस्कर आणि त्याची पत्नी अर्चना रमेश भारस्कर व त्यांच्या दोन मुली असा परिवार झोपडपट्टी भागात राहत होता. मात्र परिवारातील रमेशला दारूचे अतिवेसन जडले आणि तो दारूमुळे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला केव्हा ,केव्हा अर्चना आणि रमेश यांच्यामध्ये या चारित्र्याच्या मुद्द्यावरून वाद होत होते. सोमवारच्या रात्री रमेश दारू पिऊन घरी आला आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसोबत वाद घातला हा वाद अति विकोपाला गेल्याने रमेशने घरातील हातोडा उचलून अर्चना वरती प्रहार केला असता अर्चना जाग्यावरच गतप्राण झाली. अशी माहिती मिळाली आहे अर्चनाचा मारेकरी तिचा पती हा फरार झाला असून नंदनवन नागपूर पोलीस ठाणे येथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नंदनवन नागपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !