महिंद्रा कॅम्पर गेली बांडे नदीच्या प्रवाहात वाहून, मात्र तीन सुरजागडचे अभियंते निघाले सुखरूप

0
 महिंद्रा कॅम्पर गेली बांडे नदीच्या प्रवाहात वाहून, मात्र तीन सुरजागडचे अभियंते निघाले सुखरूप



एटापल्ली नजीक नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहन काढण्याचा अट्टहास तीन अभियंताच्या जीवावर बेतला असता मात्र वेळीच प्रसंगावधान राखून चारचाकी गाडीतून निघाल्याने ते तीन अभियंते बालबाल बचावले.पुराच्या पाण्याच्या प्रवाहात महिंद्रा कॅम्पेर वाहून गेली
गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने कहर केला
असतानाच एटापल्ली नजीक बांडे नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. या पुराच्या पाण्यातून सुरजागड लोहप्रकल्पाच्या कामावर असलेली महिंद्रा कॅम्पर गाडीतुन तीन मायनींग अभियंता आलापल्ली च्या दिशेने निघाले होते.मात्र बांडे नदीच्या पुलावर ड्रायव्हरने गाडी घातली पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने गाडी रस्त्याच्या कडेला वाहून गेली वेळीच प्रसंगावधान राखून या तीन अभियंतांनी गाडीतून उडी मारली आपला जीव वाचविला. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर वायरल झाला आहे. परंतू चालक कोन याचा अजून पता लागला नाही

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !