खांदाळी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जखमी

0
 खांदाळी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जखमी  


सोपानदेव म्हशाखेत्री 
उपसंपादक वैनगंगा वार्ता   

धानोरा:-
  खांदाळी येथे अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना आज दिनांक १८जुलै दुपारी ३:३०च्या सुमारास शेतशिवारात घडली
  संजय देवशा उसेंडी वय २८ वर्ष राहणार पवनी(धानोरा)असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून,उत्तम हिरामण पदा वय २५ वर्ष राहणार सालेभट्टी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. धानोरा तालुक्यात काल पासून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे मयत संजय व जखमी उत्तम दोघेही शेतीच्या कामाकरिता शेतावर गेले होते आज सकाळपासून धानोरा परिसरात विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान दुपारी ३:३०वाजताच्या सुमारास दोघेही शेतातील गुरे शेताबाहेर काढून शेतातील झोपडीकडे जात असतांना अचानक विजांचा गडगडाड होऊन वीज संजय च्या छातीवर कोसळली ह्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबती उत्तम पदा बाजूला असल्याने तो किरकोळ जखमी झाला, त्यांना ताबळतोब ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी संजयला मृत घोषित केले तर जखमीच्या हातापायाला थरकाप असून कानठळ्या बसल्यागत झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरु आहे,सदर घटनेची माहिती तलाठी व पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असून तलाठी यांनी मौका पंचनामा केला शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले, मृतकाच्या मागे आई वडील पत्नी चार मुली एक मुलगा आहे अचानक वीज पडून मृत्यू झाल्याने पवनी गावात शोककडा पसरली आहे,अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !