आता विद्यार्थ्यांना पहावी लागणार नाही लाल परीची वाट
लोमेश मडावी/ तालुका प्रतिनिधी मुलचेरा
मुलचेरा :-
लागाम येथील विद्यार्थ्यांना एक वर्षापासून होणाऱ्या त्रासाला आज कुठे उसंत मिळाली असे म्हणायला हरकत नाही
शासनाचा नारा आहे की मुलांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नका परंतू दळणवळणाची सुविधा जेव्हा बंद होते तर विद्यार्थी शिक्षण घेतील कूठून असा प्रश्न निर्माण होतो
लगाम ते आल्लापली मार्ग अक्षरशः खड्यानी भरलेल्या अवस्थेत असल्याने लाल परी तर या मार्गाने पाठवायला महामंडळ तयार नाही अशात एक वर्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षण एक दिवस जाणेतर चार दिवस गैरहजर राहणे हि बाब कंपनीला अधिकाऱ्यांना मिळताच लाँयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी कंपनीच्या मध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना तब्बल एक वर्षा नंतर आज दिनांक 31/07/2023रोज सोमवार ला सकाळी 7.00 वाजता कंपनी तर्फे स्कूल बस सेवा सुरू करण्यात आली या बसची पुजा विद्यार्थ्यांच्या हातुन केली व उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविभाऊ ओल्लालवार व लगाम ग्रा.प. सरपंच दिपक मडावी यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाला गावातील व इतर गावातील सुध्दा नागरिक उपस्थित होते तसेच कंपनिचे अधिकारी , ग्राम प. सदस्य राजु पंबलवार , रुषी पोरतेट मा. जि.प. सदस्य, मणिष मारटकर मा.सरपंच, प्रमोद चंदावार प्रतीष्ठीत नागरीक ,किष्णा गावडे त.मु.अध्यक्ष ,वैषव ठाखुर,गोविंद विश्वास,मनोज आचार्य, मधुकर पंबलवार,लिंगाजी दुर्गे,बोरी ग्रा .प.सरपंच .राजपुर चक सरपंच तसेच पालक वर्ग गावातील प्रतीष्ठीत नागरीक मोठ्याने उपस्थित होते