एसटी महामंडळाने केले विभागीय यंत्र अभियंत्यास निलंबित

0

एसटी महामंडळाने केले विभागीय यंत्र अभियंत्यास निलंबित



 एस टी च्या व्हायरल व्हिडिओ नंतर  तात्काळ  कारवाई




गडचिरोली  :-
 एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराची बसचा एका बाजुचे छत उखडलेल्या अवस्थेत धावत असल्याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर आणि प्रसार माध्यमांनी तो दाखविल्यानंतर महामंडळ खडबडून जागे झाले. या घटनेसाठी जबाबदार धरून महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेचे यंत्र अभियंता शि.रा. बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे..

सदर बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने हा प्रकार घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या दुर्लक्षामुळे सदर बस त्रुटीसह प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आली आणि त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी कळविले.
दरम्यान अशा खिळखिळ्या झालेल्या आणि दुरुस्तीची गरज
असलेल्या जवळपास 20 बसेस गडचिरोली विभागीय कार्यशाळेत
दुरुस्तीसाठी बोलविण्यात आल्या आहेत. त्यात अहेरी आगाराच्या 11.
ब्रह्मपुरी आगाराच्या 3 तर गडचिरोली आगाराच्या 7 बसेसचा समावेश
असल्याचे  विश्वसनीय माहिती मिळाली आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !