राष्ट्रीय महामार्गावर रोडचे
खोदकाम न करता डांबरीकरणावर टाकले सिमेंटरोड
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील आंबेडकर चौकातील विक्रम
आष्टी प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात खोदकाम न करता चक्क डांबरीकरणावर सिमेंट रोडचे काम करण्यात आले आहे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून गडचिरोली जिल्ह्यात आलेले नवीन उद्योग जे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे ते सुरजागड !
सुरजागड वरुन आजच्या घडीला जड वाहतूक ही चंद्रपूर, वणी, घुग्गूस ,राजुरा, गडचांदुर व गडचिरोली गोंदिया ,भंडारा या मार्गाने आवजड वाहतूक सुरु झाली आहे व ही अवजड वाहतूक राज्या मधील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात जात आहे आणि ही अवजड वाहतूक आष्टी येथील आंबेडकर चौकामधून इतरत्रही होते आहे
मात्र आष्टी मध्ये जो राष्ट्रीय महामार्गावर बनविण्यासाठी काम चालू आहे त्याठिकाणी आंबेडकर चौकापासून. १०० मीटर अंतरावर नालीबांधकम करण्यात आला आहे
परंतु त्यानतर आंबेडकर चौकात खोदकाम न करता डांबरीकरणावर रस्त्यावर सिमेंट रोडचे काम सुरू आहे आजुबाजुला नालीबांधकम न करता सदर बांधकाम सुरू आहे
मुख्यम्हणजे आंबेडकर चौकातील नाल्यांची पुनर्बाधणी न करता डांबरीकरणावर सिमेंट रोडचे काम केल्या जात असताना सांडपाण्याचा निचरा होणारी व्यवस्था करण्यात आली नाही ती व्यवस्था व खोदकाम न करता डांबरीकरण यावरच सिमेंटरोड चे काम का करण्यात येत आहे असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे
एन एच ३५३ चे काम हे मुख्य चौकात निकृष्ट दर्जाचे ह़ असल्याचे दिसून येते ऊ
येत आहे तो पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा दिसून येत आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकर चौकातून हायवेचे जेव्हा की चंद्रपूर वरून आष्टी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीट काम आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आलेले आहे परंतु आंबेडकर चौकामध्ये काम करीत असताना डांबरीकरण रोड न खोत काम करता डांबरीकरणावरती सिमेंट काँक्रीट करण्यात येत आहे सिमेंट रस्ता झाला आणि डांबरीकरण सिमेंट रस्ता न मिळवता खालवर झालेला आहे अर्ध्या दुकानांमध्ये पाणी घुसत आहे आणि सध्या नवीन बनवलेला रोड सुद्धा क्रॅक गेल्याचे दिसून येत आहे साहेब, शासन, लोकप्रतिनिधी सर्व गप्प मूग गिळून आहेत काय असा प्रश्न आष्टीवासीय करीत आहे .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून 100 मीटर वरती चंद्रपूर रोड ला नाली बांधकाम करण्यात आले मात्र आंबेडकर चौकात हायवे काम करीत असताना नाली चोफर नाली बांधकाम करण्यात आली नाही त्या मुळे चौकातील पाण्याचा निचरा हा कसा होणार व आता पावसाळा सुरू असल्याने चौकातील पाण्याचा निचरा होण्यास नाली नसल्यामुळे चौकात पाणी साचून आहे आणि आज अतिरुस्ती असल्यामुळे नालीतून पाणी जाण्याएवजी व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरत आहे त्यामुळे व्यापारी पण त्रस्त झाले आहे व ग्रामस्थ सुद्धा त्रस्त झाले आहे व त्या पाण्यातून रस्ता काढण्या करिता ग्रामस्थांना सुद्धा त्रास होत आहे त्या मुळे जी शासकीय बाधकाम विभागाची जुनी नाली आहे त्याच नाली वरती नवीन नाली बनवण्यात यावी जेणे करून सांड पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशी आष्टी वासियाची मागणी आहे तसेच भविष्यात अपघात होणार नाही काय असा प्रश्न व्यापारी वर्ग करीत आहे त्यामुळे साहेब आम्हा व्यापराकडे लक्ष द्याल का असा टाहो व्यापारी वर्ग करीत आहे .


