सदोष नाली बांधकामामुळे पावसाचे पाणी घुसले घराघरात
चामोर्शी नगर पंचायती चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
प्रमोद झरकर उपसंपादक
चामोर्शी -:
गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे शहरातील नाली बांधकाम सदोष पध्यतीने झाल्यामुळे ते नालीचे पाणी बाहेर न जाता घराघरात घुसत आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे जीवनावक साहित्य खराब होत आहे
सदर बाबींकडे नगर पंचायत प्रशासन व नगरसेवक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते आहे दोन तीन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस पडल्याने चामोर्शी येथील वार्ड नंबर 6-8 या दोन वार्डामध्ये नगर पंचायत च्या दुर्लक्षतेमुळे नालीचे काम सदोष पध्दतिने केल्या मुळे संतत 3 वर्षा पासुन अनेकांच्या घरात मध्ये पाणी जात या कडे तालुका प्रशासन , नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्षते मुळे दरवर्षी पावसाळ्यात वार्ड नं 6-8 या दोन्ही वार्डात 3 वर्षा पासुन पाणी घरात घुसन्याची परंपरा सुरु आहे त्यासाठी आज झालेल्या पावसामुळे वार्ड न.६. व ८ मधील
सामाजिक कार्यकर्ते सुरज नैताम, विजय ढोक, कुलदीप आत्राम अजय भाडेंकर ,भारत वैरागडे राहुल बुरांडे, ध्रुप चिचघरे, सपनिल चिचघरे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण शुभाष मशाखेत्री देवराव नैताम गोपाल नदेश्वर तुलाराम नदेश्वर दिलीप मशाखेत्री सजय वाजुरकर आदी कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले सदर नुकसानभरपाई नगरपंचायत ने द्या वी अशी मागणी नुकसान ग्रस्त कुटुंबांनी केली आहे

