दुथळी भरलेल्या वैनगंगा नदीत तरुणाने मारली उडी

0
 दुथळी भरलेल्या  वैनगंगा नदीत तरुणाने मारली उडी


 गडचिरोली , चंद्रपूर जिल्हा सीमा भागालगत व्याहाड (बुज) नदी पुलियावरील घटना

गडचिरोली;-
चंद्रपूर  ते गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा भागावर असलेल्या वैनगंगा नदीच्या व्याहाड (बुज) जवळील नदीच्या पात्रात रात्री ९ वाजेच्या सुमारास २० जुलै रोजी आपली गाडी बाजूला ठेवून नदीच्या पत्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २० जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एमएच ३३ एच ६७८१ ही दुचाकी घेऊन एक युवक नदीवरील पुलावर येऊन थांबला आणि काही वेळाने आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला ठेवून वैनगंगा नदीच्या पात्रात पुलावरून उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. उडी घेणाऱ्या त्या युवकाला नदीपात्रामध्ये उडी घेताना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या अनेकाने पाहिले असल्याची माहिती  आहे सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू असून अति मुसळधार पाऊस सुरू असल्याने वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे आणि अशावेळी या युवकांने नदीपत्रात उडी घेतली आहे. झालेल्या घटनेची वार्ता हदीमधील पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये एकाकी उडी घेणाऱ्या युवकाला नदीपात्रात शोधण्याकरीता शोध कार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !