नराधमांनी वासनेच्या आहारी जाऊन केला एका पन्नास वर्षीय महिलेवर अत्याचार

0

नराधमांनी वासनेच्या आहारी जाऊन केला एका पन्नास वर्षीय महिलेवर अत्याचार.


आता माणुसकी जीवंत राहिलीच नाही.

यवतमाळ/ वणी

तालुक्यातील राजूर कॉलरी येथील मजूर एका ५० वर्षीय मजुर महिलेवर चार नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना २९ जून रोजी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, राजूर कॉलरी येथे चूनाभट्टा परिसरात
वास्तव्यास असलेल्या महिलेला २८ जून रोजी रात्री उचलून नेऊन
तीच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुका हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हि महीला राजूर कॉलरी येथे चूना भट्यावर काम करून आपला
उदरनिर्वाह चालवित होती. पिडीत महिलेच्या मुलाचे आरोपी मधिल एका सोबत आर्थिक व्यवहार होता, त्यामुळे २८ जून ला सायंकाळी चारही आरोपी पैसे मागण्यासाठी राजूर कॉलरी येथे
पिडीतेच्या घरी गेले, मात्र पिडीत महिलेचा मुलगा घरी नव्हता, आरोपींनी महिलेला विचारले असता मुलगा घरी नाही असे सांगितले.
आरोपीने तुझ्या मुलाच्या विरोधात तक्रार करायची आहे. असे सांगुन पिडीत महिलेला वणी येथे आणले तर या नंतर एक अर्टीका कार किरायाणे करून त्या महिलेला बसवून मुकुटबन रोड वरील एका बारमध्ये जाऊन दारू पिल्ले व एका पाण्याच्या बॉटल मध्ये दारू मिक्स करून आणून आरोपींनी कारमध्ये पिडीतेला जबरदस्तीने दारू
पाजण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ते खडकी (बुरांडा) व नंतर करनवाडी मार्गे नवरगाव गेले. तिथे एका शेतात पिडीत महिलेवर पाशवी अत्याचार केला. व अनैसर्गिक कृत्य देखील केले. त्यानंतर आरोपीने महिलेला राजूर फाट्यावर सोडून पळ काढला. दुसऱ्या दिवशी २९ जून रोजी पिडीत महिलेने वणी
पोलिस स्टेशन गाठून याबाबतची माहिती पोलीसांना दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पिडीत महिलेची तक्रार दाखल करून काही तासांतच आरोपीला जेरबंद केले. विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९) रा. टागोर चौक, वणी. कपिल व्यंकटेश अंबलबार (३५) रा. जैताई. नगर वणी, मनोज अजाबराव गाडगे, (४७) रामपुरा वार्ड वणी, वैभव घनश्याम गेडाम (२२) आयटीआय जवळ लालगुडा यांचा आरोपी मध्ये समावेश आहे. आरोपीवर ३५४ (अ) (१) ३६६,३७६ (ड) ५०४, ५०६, व एट्रोसिटी ३ (१) (w) (I) ३(१) (v)li ३ (२) (v) ३ (२) (va) कलमान्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्दे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजीत जाधव, एपिआय माया चाटसे, सपोनी माधव शिंदे, सपोनी आषिश झिमटे, पोलिस कर्मचारी विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, शुभम सोनुर्ले, चालक रवि ईसनकर यांनी
केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !