दुचाकीच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

0
 दुचाकीच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू


अशोक खंडारे मुख्य संपादक 

 देसाईगंज -:
 कुरखेडाकडून वडसाच्या दिशेने जातांना दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला आदळल्याने शिक्षक दिपक शामराव पिल्लेवान यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. विसोराच्या बसस्थानकापासून वडसा मार्गांवर अवघ्या दोनशे मिटर अंतरावर सदर अपघात झाला.
  कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक दिपक शामराव पिल्लेवान (49) आज जागतिक योग दिननिमित्त शाळेत गेले होते. तिथून ते तहसील कार्यालय कुरखेडा येथे बिएलओ म्हणून कामासाठी गेले. आपली दुचाकी क्रं एम एच ३३ व्हाय ३०६७ ने परत कुरखेडावरून वडसाला जात होते. कुरखेडा-वडसा या मार्गांवरील विसोरा ते सीताबर्डी दरम्यान असलेल्या गाव, किलोमीटर दर्शक फलकाच्या जवळ पिल्लेवान यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. दुचाकीसह पिल्लेवान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देत शेतात पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अखेर त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आप्त परिवार आहे. पिल्लेवान गुरुजीच्या निधनाने शिक्षक मित्र, सहकारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !