मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार आयपीएस नयोमी साटम यांनी स्वीकारला

0
मंगळवेढा पोलीस
ठाण्याचा पदभार आयपीएस नयोमी
साटम यांनी स्वीकारला



मंगळवेढा:-
मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार आयपीएस प्रशिक्षणार्थी नयोमी साटम यांनी घेतला असून मंगळवेढ्यातील अवैध धंद्याची पाणेमुळे शोधून नष्ट करणार आहे. मंगळवेढ्यातील सामान्य जनतेच्या मनात पोलीसांविषयी अभिमान वाटावा असे काम करणार आहे.
मी कुणाच्याही दबावाला जुमानणार नाही, माझ्या पद्धतीनेच मी काम करून कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणार असल्याची माहिती त्यांनी
मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वरवडे-फळसेवाडीची व मुंबई बोरीवली (पूर्व) येथे स्थायिक असलेल्या नयोमी साटम या २०२१ आर. आर. बॅचच्या अधिकारी आहेत, त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरता सोलापूर जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली आहे.
मंगळवारी दुपारी त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार घेतला आहे. १९ जून ते ९ सप्टेंबर पर्यंत त्या मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणार आहेत. यावेळी बोलताना साटम म्हणाल्या, प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर पोलीस दिसेल, गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ते पूर्णपणे बंद करण्यात येतील.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !