अशोक खंडारे मुख्य संपादक
मारेगाव : तालुक्यातील एका खेड्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. १३ मे चे रात्री घडली. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळाली नाही. या विरुध्द मुलीच्या वडिलांनी तिला कोणतरी फुस लावुन पळवून नेले असल्याची तक्रार पोलिसात आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत काही तासात अल्पवयीन मुलीसह आरोपीला मोबाईल लोकेशन च्या आधारे मोठ्या शिताफीने संजय गजानन देठे रा. सोणापुर ता. वणी याला भद्रावती जि. चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. वृत्त लीहिस्तोव पोलिस कार्यवाही सुरू होती. पुढील तपास जमादार रजनीकांत पाटील व अजय वाभीटकर करीत आहे.