प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
गडचिरोली : तेंदूपाने संकलन करण्यासाठी कुटुंबासह मारोड्याच्या जंगलात गेलेल्या मजुरावर रानडुकराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार, १३ मे रोजी सकाळी ७ वाजता घडली. पांडुरंग बालाजी मोहुर्ले (६१, रा. राखी, ता. गडचिरोली) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
पांडुरंग मोहुर्ले हे आपली तीन मुले व तीन सुनांसोबत गडचिरोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुरखळा उपक्षेत्रातील मारोडा जंगलात तेंदूपाने संकलन करण्यासाठी शनिवारी सकाळी ६ वाजता घरून निघाले. गावापासून जवळपास ४ किमी अंतरावरील मारोडाच्या जंगलात ते गेले.
तेंदूपाने संकलनाच्या कामात व्यस्त असतानाच एक रानटी डुक्कर त्यांच्या दिशेने आले व पांडुरंग मोहुर्ले यांना गंभीररीत्या जखमी केले.
मोहुर्ले यांच्या मुलांनी त्यांना लवकर घरी आणले व याबाबतची माहिती
वनविभागाच्या कर्मचान्यांना दिली.. त्यानंतर गुरवळा येथील राजपाल खोब्रागडे यांच्या मदतीने मोहुर्ले यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्या इसमाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे