सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक
धानोरा, 15 मे : तालुका मुख्यलयापासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या लेखा येथील नरेश तोफा (अंदाजे वय 55) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 14 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त महितीनुसार, लेखा येथील नरेश तोफा हे सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावाजवळील तलावानजीकच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लागले असल्याचे जंगलातून येणाऱ्या लोकांना निदर्शनास आले. घटनेची माहिती लगेच घरातील व्यक्तींना देण्यात आली. तसेच सदर घटनेची माहिती फोन वरुन पोलीस स्टेशनला देण्यात आली. वृत्त लिहेस्तव मृतदेह गावातच होता. तोफा यांनी गळफास का घेतला हे अद्याप कळलेले नाही. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अचानक गळफास घेतल्याने गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे. ©©