पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून गर्भवती प्राध्यापिकेने केली आत्महत्या, व्हाॅट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड़

0
 पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून गर्भवती प्राध्यापिकेने केली आत्महत्या, व्हाॅट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड़


अशोक खंडारे मुख्य संपादक

छत्रपती संभाजीनगर: शहरातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दिपक नागलोत (वय २९ वर्षे) यांनीसासरच्यांकडून पैशांसाठी होत असलेला छळ व पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब न्यायालयात समोर उघड झाली आहे.प्रा. वर्षा दीपक नागलोत यांनी ३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांचा पती दिपक तेव्हापासून अटकेत आहे. त्याने न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, वर्षा यांच्यामाहेरच्यांकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे, विवाहबाह्य संबंध व त्या प्रेयसीला दिलेला छळाची गंभीर दखल घेत न्यायालयाने गुन्ह्यात दोषारापपत्र दाखल झाल्यानंतरही दीपकचा जामीन नाकारला. आत्महत्या केली तेव्हा वर्षा सात महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पती दीपक नागलोत (वय ३२ वर्षे) सह सासरा राजाराम नागलोत (वय ६० वर्षे), सासू देविका (वय ५५ वर्षे), नणंद वैशाली (वय २५ वर्षे, सर्व रा. गजानन कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रेमविवाह करूनही दिपक व त्याच्या वडिलांनी वर्षा यांच्या माहेरच्यांना सातत्याने पैशांची मागणी करत लाखो रुपये घेतले. त्यानंतरही दिपकचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. त्यातून त्याने पत्नी वर्षा यांचा छळ सुरू केला होता. व्हॉटसअप चॅटिंगमधून दीपकची विकृती स्पष्ट झाली होती वर्षा यांच्या आत्महत्येच्या दिवशी दिपकला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र देखील दाखल केले.अटकेपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत आहे. वर्षा यांच्या माहेरच्यांच्याबाजूने ॲड. प्रशांत नागरगोजे, विष्णू नरके यांनी बाजू मांडत दीपकच्या जामिनाला विरोध केला. पैसे घेतल्याच्या पुराव्यांसह त्याच्या प्रेयसीसोबतचा संवादाचे सबळ पुरावेच ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत त्याच्या छळाचा पाढाच वाचला. त्यानंतर सत्र न्यायाधीश न्या. वर्षा पारगावकर यांनी दिपकचा जामीन अर्ज फेटाळून लावला. विशेष म्हणजे, अर्जदारासारखी व्यक्ती समाजासाठी धोकेदायक आहे, अशी गंभीर टिप्पणीदेखील न्यायालयाने केली.
माहेरच्यांकडून घेतलेले पैसे हुंडा म्हणूनच ग्राह्य
न्यायालयाने जामीन नाकारताना आरोपी पक्ष माहेरच्यांकडून आरोपींच्या खात्यावर आलेले लाखो रुपये का घेतले हे सांगण्यात कमी पडला. त्यामुळे हे पैसे हुंडा म्हणूनच ग्राह्य धरल्याचे अॅड. नागरगोजे यांनी सांगितले. आरोपींनी सातत्याने साक्षीदारांवर दबाव टाकला. त्यात दोन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल झाले. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. प्रेयसीनेदेखील त्याच्या त्रासाविरोधात चिकलठाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याची देखील न्यायालयाने दखल घेतली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !