अशोक खंडारे मुख्य संपादक
जोगीसाखरा : रोपवाटिकेतील विजेच्या धक्क्याने एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना दि. १४ मे रोजी दुपारी तीन वाजता जोगीसाखरा (ता. आरमोरी) येथे घडली.
सुभाष पटवारी शेंडे (२२, रा. जोगीसाखरा) असे मयताचे नाव आहे. तो एक महिन्यापासून जोगीसाखरातील कक्ष क्र. ७६६ मध्ये रोपवनात चौकीदार म्हणून काम करत होता. रोपवाटिकेत विद्युतपंप दुरुस्ती करीता इलेक्ट्रिशयन येणार असल्याने त्यांच्या मदतीकरिता सुभाष शेंडेसह चार मजूर गेले होते. यावेळी रोहित्राला स्पर्श करताच सुभाषला जोराचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरमोरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास उपनिरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.
त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. कर्ता मुलगा
गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले असून, आर्थिक मदत करावी, अशी
मागणी होत आहे.