अशोक खंडारे मुख्य संपादक
गडचिरोली:-
जिल्ह्यात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील मजूर तेंदूपत्ता संकलन तसेच बोध भरतीसाठी परराज्यात जात असतात. अशातच छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन केंद्रावर बोध भराईसाठी गेलेल्या भेंडाळा येथील मजुराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारला घडली. नितीन देवराव तुंबडे (32) रा. भेंडाळा, असे मृतक मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील रहिवासी नितीन तुंबडे हा गावातील सहकाऱ्यांसोबत छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात तेंदूपत्ता बोध भराईसाठी गेला होता. दिवसभर काम करून रात्री झोपेत असताना नितीनच्या हाताला विषारी सापाने दंश केला. काहीतरी चावल्याचे लक्षात येताच तो जागा झाला असता, सापाने दंश केल्याचे निदर्शनास आले. सहकाऱ्यांनी त्याला सुकमा येथील दवाखान्यात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेन केल्यानंतर मृतदेह भेंडाळा येथे आणण्यात आला. घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तुंबडे कुटूंबावर दुःखाचा डोंगर
कोसळला आहे.