पत्नीचा होता प्रियकराकडे नेम , म्हणून केला पतीचा गेम केला

0
 पत्नीचा होता प्रियकराकडे नेम , म्हणून केला पतीचा गेम केला




 वरूड पोलिसांनी २४ तासात केला हत्येचा उलगडा.....

अशोक खंडारे मुख्य संपादक


अमरावती:-
 राजेन्द्र ढोके यांच्या विहीरीत अनोळखी इसमाचे हाडे पोत्यात भरून टाकलेली मिळुन आल्याने पो.स्टे. वरुड येथे अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द अप क्र. ३९७ / २३ कलम ३०२,२०१ भा. द. वी. प्रमाणे नोंद करण्यात आला होता.. घटनेचे गांभीर्य पाहता. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ अमरावती ग्रामीण यांनी घटनास्थळाला भेट देवुन गुन्हयात मृतक याची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हा
उघडकीस आणणे बाबत तपासी अधिकारी यांना मार्गदर्शन करून
आदेशित केले होते.
 मृतकाची ओळख पटविण्याकरीता परीसरातील मागील काही काळात हरविलेले मिळून न आलेल्या इसमांच्या अभिलेखाची
तपासणी केली असता ग्राम एकलविहीर येथील शेषराव वासुदेव
ईरपाची हा काही महीन्यापुर्वी हरविला असून अद्याप मिळुन न आल्याने त्याची पत्नी नामे रंजना
शेषराव ईरपाची हिचा शोध घेतला असता ती ग्राम शहापुर येथे दुस-या पुरुषा सोबत राहत असल्याचे माहीती मिळाली
वरुन तिला मृतक हयाचे कपडे दाखविले असता ते तिच्या वर नमुद पतीचेच असल्याचे तिने ओळखले.
पोलीसांनी नमुद महीला व ती ज्या सोबत राहत होती तो ईसम नामे
ज्ञानेश्वर किसनराव कुमरे यांची कसून चौकशी केली असता सदर
महीलेचे व ज्ञानेश्वर कुमरे यांचे अनैतिक संबंध असुन सदर बाब
महीलेचा मृतक पती हयाला माहीत पडल्याने तो तिला मानसिक व
शारीरीक त्रास देत होता.
सदर त्रासाला कंटाळुन रंजना हिने ज्ञानेश्वर कुमरे याचेसांबत कट रचुन
कु-हाडीने शेषराव ईरपाची याचे मानेवर सपासप वार करुन मुंडके
धड वेगळे करून शरीराचे तुकडे करुन पोत्यात भरुन विहीरीत फेकुन
दिले असल्याची कबुली दिली
आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील
तपास वरुड पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, 
अमरावती ग्रा. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव अमरावती ग्रा., उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे मोर्शी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप चौगांवकर पो.स्टे. वरूड, पो.उप.नि. धिरज राजुरकर, दिपक
वळवी,मंगेश शेगोकार पोलीस अमलदार राजु मडावी, दिलीप राउत, किरण दहीवाडे, समीर धांडे, रत्नदिप वानखडे, विनोद पवार, सचिन भगत, राजु चव्हाण, प्रफुल्ल लेव्हरकर, किरण गावंडे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !