ब्रम्हपुरी बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा सभापती पदावर प्रभाकर सेलोकर तर उपसभापतीपदी सो. सुनीता तिडके अविरोध
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
ब्रह्मपुरी:-
ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची व उपसभापतिपदाची निवडणुक आज दि. 12 मे रोजी अविरोध पार पडली आहे. यामध्ये सभापतीपदी काँग्रेसचे प्रभाकर सेलोकर व उपसभापतिपदी सौ. सुनिता खेमटाज तिडके यांची अविरोध निवड झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले होते. तट भाजप प्रणित पॅनेलचे 4 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे बाजार समीतीवर काँग्रेसची एक हाती सत्ता बसली आहे. ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षांपासून काँग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. त्यामुळे यावर्षी देखील आपली सत्ता कायम राखणे हे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे होते. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय
वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलने ही निवडणूक लढवली होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी अतिशय उत्तम पध्दतीने
नियोजन करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशश्री खेचून आणत आपल्या नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा दाखवुन दिली आहे.
केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप पक्षाच्या पुरस्कृत पॅनलला मात्र अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले होते.
सहकारी संस्था गटातील सर्वसाधारण मतदार संघात काँग्रेस प्रणित पॅनेलचे अरुण अलोने, राजेश तलमले, दिवाकर मातेरे, प्रमोद मोटघरे, किशोर टाऊत हे विजयी झाले होते. तर महीला राखीव गटातुन कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलच्या सौ. सुनिता खेमराज तिडके, सौ. अंजली अनंता उरकुडे ह्या विजयी झाल्या होत्या. विमुक्त जाती / भटक्या जमाती गटातुन काँग्रेस
पुरस्कृत पॅनलचे ब्रम्हदेव दिघोरे हे विजयी झाले होते.
ग्रामपंचायत मतदार संघात काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेश धोटे, संजय राऊत, प्रेमानंद मेश्राम, ज्ञानेश्वर झरकर हे विजयी झाले होते.. व्यापारी व अडते मतदार संघातून काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे प्रशांत उराडे विजयी झाले होते. निवडणुकीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नवनियुक्त सभापती व उपसभापती यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

