लहान मुलांना क्रूरपणे मारहाण प्रकरण, शिक्षकेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
लहान मुलांना क्रूरपणे मारहाण प्रकरण, शिक्षकेचा अटकपूर्व जामीन फेटाळला


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

लहान मुलांना बालवाडीत क्रूरपणे मारणाऱ्या दोघा शिक्षिकेचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज आज कोर्टाने फेटाळून लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये या दोन शिक्षिका लहान मुलांना क्रूरपणे मारताना दिसत आहेत, एवढा पुरावा त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यास पुरेसा असल्याचं म्हणत कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कांदिवली येथे ही बालवाडी आहे. या ठिकाणी 28 मुलांनी ऍडमिशन घेतलं आहे. दोन ते चार वर्षाची मुलं या बालवाडीत जात असतात. या बालवाडी तील काही मुलं घरी आल्यावर आक्रमकपणे वागत असल्याचं त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं. त्याच प्रमाणे ते विचित्र वागत असल्याचं ही लक्षात च्या लक्षात आलं. याबाबात चौकशी केल्यावर दोन मुलांना त्यांच्या शिक्षिका क्रूरपणे मारत असल्याचं लक्ष्यात आलं. पालकांनी बालवाडीच सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. त्यात भयानक प्रकार समोर आला. या दोन शिक्षिका लहान मुलांना क्रूरपणे मारत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून उघडकीस आलं.
याबाबत तात्काळ कांदिवली पोलीस स्टेशन येथे पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाए. मात्र, गुन्हा दाखल होताच या शिक्षिका अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई सेशन कोर्टात गेल्या. यावेळी मुलांच्या तक्रारदार पालकांनाही या केस मध्ये इंटरव्हेनन करण्याची परवानगी देण्यात आली. आम्ही मुलांना मारलं नाही. त्यांना समजावत होतो, अस शिक्षकेच्या वकिलांच म्हणणं होतं. मात्र, बळीत मुलांच्या पालकांनी जेव्हा कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केलं. तेव्हा सर्वाना घाम फुटला. दोन विद्यार्थ्यांना शिक्षिका क्रूर पणे मारत असल्याचं दिसून आलं. हे कोर्टाने पाहिल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. दोन चार वर्षाची मुलं शिक्षण घेण्याच वय त्याच. या वयात त्यांना अशी मारहाण केली जात आहे. त्याच्यावर वाईट परिणाम होत असतो. कोवळ्या मनाची मुलं आहेत ही त्यांना योग्य प्रकारे हाताळायला हवं. अस असताना त्यांना जी मारहाण झाली आहे. ती चुकीची आहे. सीसीटीव्ही मध्ये सर्व कैद झालं आहे. हे पुरावे पुरेसे आहेत या शिक्षकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यासाठी, अस म्हणत कोर्टाने दोन्ही शिक्षकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !