पूर्णवेळ ग्रामसेवक द्या
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मागणी
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शीत तालुक्यातील अनखोडा येथील ग्रामपंचायतीत दोन वर्षापासून
प्रभारी ग्रामसेवक कार्यरत असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने पूर्णवेळ ग्रामसेवक द्या अशी मागणी अनखोडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिनांक 18. एप्रिल मंगळवारी निवेदन देऊन केली. अनखोडा ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी ग्रामसेवकाच्या खांद्यावर आहे. सध्या प्रभारी ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले वसंत बारसागडे यांच्याकडे चौडमपल्ली ग्रामपंचायतीचा सुद्धा प्रभार आहे. चौडमपल्ली ग्रामपंचायतील गावे व अनखोडा हे गाव वेगवेगळ्या मार्गावर असल्याने ग्रामसेवक आवश्यक तेवढा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबत असून याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे व ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी अनखोडा ग्रामपंचायतीला प्रभारी ग्राम सेवक न देता पूर्णवेळ ग्रामसेवक द्या व याची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यानी मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली. यावेळी अनखोडा येथील सरपंच रेखाताई येलमुले, उपसरपंच वसंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुरवटकर, भंतेश निमसरकार, लक्ष्मण पोटे, संध्याताई कुकुडकर, सुरेखाताई मेश्राम, रागिणीताई डोर्लीकर, अस्मिता ताई शेडमाके उपस्थित होत्या.