डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जातीचे नसून संपूर्ण मानव जातीचे आहेत प्राचार्य डॉ. पी .के. सिंग

0
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जातीचे नसून संपूर्ण मानव जातीचे आहेत प्राचार्य डॉ. पी .के. सिंग


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

    श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे 14 एप्रिल 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग , मंचावर प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. एम पी सिंग,  डॉ. कश्यप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली  प्रा. सुबोध साखरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज आहे तरच शैक्षणिक, सामाजिक,  आर्थिक क्रांती घडून येईल असे सांगितले.. प्राचार्य डॉ. पी के सिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानव जातीसाठी  कार्य केलेले आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व सजीव व निर्जीव घटकाला समान न्याय देण्याचं कार्य यांनी केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  हे जागतिक कीर्तीचे विद्वान ठरलेले आहेत असे विचार व्यक्त केले महाविद्यालयातील बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थी नयन रामगोणवार याने डॉ. बाबासाहेबांचे विद्यार्थ्यांप्रती विचार भाषणातून मांडले. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षता गोमासे, टिंकल शेंडे आणि ग्रुप, गौरी कुकुडकर, अंजली खडसे, राशी मूडमडीगेला, संजना मडावी आणि ग्रुप यांनी गीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 
    कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्निल धुरके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.महेश  सिलमवार यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रकाश राठोड, डॉ.सोनाली  धवस , डॉ. दीपक नागापुरे, प्रा. संजय मुरकुटे, प्राध्यापिका जया रोकडे, प्रा. कवींद्र साखरे, प्रा. राहुल आवारी, शुभांगी डोंगरे, विजुभाऊ खोब्रागडे, अविनाश जीवतोडे, सविता गारघाटे, उषा माहूरपवार, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहने आदींनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !