लिटील हार्ट इंग्लिश मिडीयम हाॅयस्कूलमध्ये बक्षिस वितरण
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी :- स्थानिक लिटील हार्ट इंग्लिश मिडीयम हाॅयस्कूल शाळेत बक्षिस वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्य वाव देण्यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जसे सामान्य ज्ञान, चित्रकला स्पर्धा, सांकृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, विविध प्रकारचे खेळ इत्यादी तसेच शाळेतील काही विद्यार्थी जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर चमकले त्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष अनिल आल्लुरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे , सरपंच श्रीमती बेबीताई बुरांडे, डॉ. ओ. पी. सिंग, पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पाल , सौ. पांडे सौ.यारेवार शाळेचे मुख्याध्यापक कृष्णमुर्ती गादे, सचिव . रमेश आरे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच बेबीताई बुरांडे यांनी शाळेचे तोंड भरून कौतुक केले. कारण सार्वजनिक सुट्टीच्या दिवसी बक्षिस वितरण करून शाळेने विद्यार्थ्यांची काळजी घेतली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पोलीसे निरीक्षक कुंदन गावडे यांनी शाळेनी पोलीस कार्यालय गडचिरोली तर्फे राबविलेल्या जिल्हास्तरीय मॅरोथोन स्पर्धेसाठी शाळेकडून २५०००/- दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णमूर्ती गादे, संचालन राजेश खोब्रागडे, तर आभार राजू रागुला यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.