डोंगरगाव येथे आज अभिवादन सभेचे आयोजन
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
डोंगरगाव (ता. मंगळवेढा)-: ग्रामपंचायत डोंगरगाव, रमाई फौंडेशन, भाजपा ओबीसी सेल व समाजसेवक ngo यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता डोंगरगाव ग्रामपंचायती समोर सर्व पक्षीय अभिवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका तथा डोंगरगाव च्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे यांनी दिली.
या आभिवादन सभेचे अध्यक्ष स्थान मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने हे अध्यक्षस्थानी राहणार असून आ. समाधान आवताडे, मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विवेक खिलारे,कांग्रेस चे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, माजी नगरसेवक अंकुश शेंबडे, प्रहार चे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, शेतकरी संघटनेचे दामाजी मोरे,डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, डोंगरगाव उपकेंद्राच्या डॉ. सपना राठोड, डोंगरगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे, उपसरपंच प्रदीप चौगुले, सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर मस्के, डोंगरगाव उपकेंद्राच्या परिचारिका गौरी कांबळे, अ. भा. रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष समाधान भोसले, महिला आघाडीच्या नेत्या वैशाली चंदनशिवे, कृषीविकास फौंडेशन चे संस्थापक पंकज मस्के आदींची उपस्थिती राहणार असून सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ही सारिका खिलारे यांनी केले असून सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी सरपंच सचिन आकळे, उत्तम भूसे, संगम खडतरे, अमोल मेटकरी, ज्ञानेश्वर साखरे, बबन साखरे आदी परिश्रम घेत आहेत.