भारत जोडो यात्रेची नियोजन बैठक

0
भारत जोडो यात्रेची नियोजन बैठक


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

आरमोरी तालुका कॅांग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक व तालुका कॅांग्रेस मेळाव्याचे आयोजन केले. तसेच या प्रसंगी नवनियुक्त तालुकाध्यक्ष  मिलिंद खोब्रागडे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. गडचिरोली जिल्ह्याला १७ नोव्हेबंर रोजी पातुर येथे पदयात्रेत सम्मिलित व्हायचे असल्याने त्या व्यवस्थेविंषयी चर्चा पार पडली व जास्तीत जास्त संख्येने भारत जोडो यात्रेत सम्मिलित होण्याचे ठरले. सभेला महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान, सभेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, उद्घाटक माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॅा. नितिन कोडवते, जेष्ठ कॅांग्रेस नेते भातकुलकर साहेब, विश्वासजी भोवते यांनी सम्बोधित केले. सभेचे संचालन नंदुजी नरोटे यांनी केले.  या प्रसंगी मंचकावर आनंदरावजी आकरे, रामभाऊ हस्तक, केशवराव गेडाम, रुपेशजी टिकले, रजनीकांतजी मोटघरे, मनिषाताई दोनाडकर, उषाताई बारसागडे, निर्मलाताई किरमे, पुष्पाताई लोणारे, मंगलाताई कोवे, वृंदाताई गजभिये, किरनताई म्हस्के, संगीताताई पेंदाम, मुकेशजी वाघाडे, भिमराजजी बोरकर, भुपेशजी कोलते, विजयजी सुपारे विराजमान होते व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.*

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !