कृषी विभाग वडसा यांच्या मार्गदर्शनात वनराई बंधारा बांधकाम
वडसा प्रतिनिधि वैनगंगा वार्ता न्यूज १९
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता न्यूज १९
वडसा विसोरा (वा)- कृषी विभाग वडसा यांच्या मार्गदर्शनात हनुमान मंदिर कोरेगावच्या शेजारी असलेल्या नाल्यावर सिमेंट पिशव्यांमध्ये माती भरून कृषी क्रांती बहुउद्देशीय शेतकरी बचत गट सदस्यांच्या सहकार्याने वनराई बंधारा आज बांधण्यात आला.
यावेळी कृषी सहाय्यक योगेश बोरकर, कृषी विभाग वडसा यांच्या उपस्थितीत कृषी क्रांती बहुउद्देशीय शेतकरी गटातील राहुल नाकाडे (अध्यक्ष), मयूर तुमराम (कोषाध्यक्ष), धनंजय मस्के (सचिव), राकेश गायकवाड, प्रमोद गायकवाड, प्रतीक नाकाडे, राहुल नंदरधने, डाकराम राऊत, हिवराज मेश्राम, रितेश डोंगरवार सदस्य गण यांच्या सहकार्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले.
बांधकामासाठी लागणारी सर्व साहित्य कृषी विभाग वडसा यांच्या माध्यमातून मिळाले. या वन बंधाऱ्याचा उपयोग जवळपासच्या शेतकऱ्यांना तसेच वन्य जनावरांना पाण्यासाठी उपयोग होणार आहे. अशा प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम दरवर्षी कृषी विभाग वडसा यांच्या माध्यमातून राबवली जात असते.