नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश बातमी "अफवा" -आविसं अध्यक्ष बानय्या जनगाम

0


नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश बातमी "अपवा" -आविसं_अध्यक्ष बानय्या जनगाम

उपसंपादक प्रविण तिवाडे


सिरोंचा: सिरोंचा नगर पंचायतचे 10 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश कणार असल्याची बातमी TV9 मराठी वृत्तवाहिनीवर आलेल्या बातमी 'अफवा' असल्याची माहिती आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी दिले आहे.सिरोंचा नगर पंचायतमध्ये आविस समर्थनाने 10 नगरसेवक निवडणुकीत दणदणीत विजयी झाले असून सिरोंचा नगर पंचायतवर आविसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. माजी आमदार दिपकदादा आत्राम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली 10 नगरसेवक आविसमध्ये असल्याची माहिती आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
अहेरी विधानसभेसह सिरोंचा तालुक्यातील आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची अफवा किंवा इतर विषयावर विश्वास न ठेवता आविस पक्षासाठी एकनिष्टतेने काम करण्याची जबाबदारी सर्वानी घेऊन आगामी येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त आविस उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन माजी आमदार दिपकदादा आत्राम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !