जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम संपन्न

0


जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम संपन्न
    
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता                                                                  

अडपल्ली(माल):आज दिनांक 15 नोव्हेंबर २०२२ रोज मंगळवारला  आमचे राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) येथे जननायक भगवान बिरसा यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  मुख्याध्यापक  एन .एस.बोरकुटे हे होते तर  प्रमुख अथिती  म्हणून .आर.आर.सरकार पाळीप्रमुख ,जेष्ठ शिक्षक  वाय.व्ही.मडावी ,आर पी लाकडे हे होते. या प्रसंगी आकाश गलबले, खुशाल राऊत, अपूर्व मंडल, आदित्य कावळे, आचल कावळे, पलक कावळे, आर्या कुद्रपवार, अनुष्का दुधे,प्रथम शेंडे, प्रकाश विश्वास, संघवी नेवारे इत्यादी  विद्यार्थ्यांची सुध्दा भाषणे झाली त्यांनी आदिवासी क्रांतिकारक बीरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच आर पी लाकडे व मुख्याध्यापक एन.एस. बोरकुटे यांनी आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक वाय. व्ही. मडावी यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात वाय.वी मडावी यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्याबाबत सविस्तर माहिती विदयार्थ्यांना दिली.  संचालन एम बी भोयर यांनी केले तर आभार ,डी.एस.नाईकवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे.ए.शेख  सौ.के.एस.गुंडावार      , डी.व्ही.गेडाम ,ए.व्ही. बोकडे , प्रकाश मुडपल्लीवार ,एल.पी.झाडे  यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी हजर होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !