श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वीर बिरसा मुंडा जयंती साजरी

0
श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वीर बिरसा मुंडा जयंती साजरी


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक  15 /11/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली   कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रासेयो चे सह कार्यक्रमाधिकारी प्रा सुबोध साखरे डॉ अपर्णा मारगोनवार डॉ दीपक नागापुरे प्रा महेश शिल्लमवार प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा राहुल आवारी प्रा कवींद्र साखरे  हे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रांतिवीर वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पि के सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून आदिवासी समाजाला सन्मानाने जगण्यासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला ते  एक समाज सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केले त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे विचार व्यक्त केले   व प्रा सुबोध साखरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ दीपक नागापुरे  यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील  शिक्षकेतर कर्मचारी  संदीप मानापुरे रवींद्र झाडे कुमारी शुभांगी डोंगरे सविता गारघाटे विजय खोब्रागडे अविनाश जीवतोडे उषाबाई माहूर पवार व मोठ्या संख्येने रासेयो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !