मंगळवेढ्यात बाळासाहेबांची शिवसेना, अ.भा. रिपब्लिकन पक्ष व प्रहार एकत्र

0


*मंगळवेढ्यात बाळासाहेबांची शिवसेना, अ.भा. रिपब्लिकन पक्ष व प्रहार एकत्र*

*मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या समिंदर विरुद्ध कारवाई करा*

मंगळवेढा-: आमचे हप्ते मुख्यमंत्र्या पर्यंत जातात त्यामुळे त्यांनी कसलेही आंदोलन करू द्या असे म्हणून आंदोलकांची टर उडवणारे मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर वरती वरिष्ठांनी व महाराष्ट्र शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
            प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर ,तहसीलदार स्वप्नील रावडे तसेच तलाठी एजेंट सुरज नळे यांनी साखळी पद्धतीने केलेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्या विरुध्द प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी या व अन्य मागाण्यांकरिता गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष  व प्रहार संघटना यांच्या वतीने मंगळवेढा येथील नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर-तालुक्यात भुरटी दादागिरी करणाऱ्या आप्पासाहेब समिंदर  यांच्या दलाल ,एजेंट यांनी आंदोलनात घुसून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा नाईलाज झाला.
1. मंगळवेढा तालुक्यातील काझी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
2.इंडोसिड बँकेच्या व्यवस्थापकाच्या गैर कारभारविरुद्ध कारवाई करण्यात यावी.
3.नवीन संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांना तात्काळ नोटीसा देण्यात याव्यात.
4.खोटे प्रतिज्ञा पत्र तयार करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या मौजे शेलेवाडी येथील सुनीता डांगे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. 
5.मौजे हाजापुर येथील पारधी समाजातील व्यक्तींना जातीचे दाखले देणे कामी अडवणूक करणारे प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.
आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. 
        यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे ,बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय गेजगे, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्रय्या माळी, तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, व्होलार समाज संघटनेचे शिवाजी जावीर,हिंदू आदिवासी पारधी समाजाचे नेते भाई रवींद्र काळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष अशोक रणदिवे, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे रोहित एकमल्ली, पंकज काटे, बबन भोसले ,रानीताई भोसले, दिलमा शिंदे, यांच्या सह शेकडो उपस्थित होते.
      यावेळी हजारो वाहने ठप्प झाली होती. या आंदोलनास मंगळवेढा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शेवटी निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारून ते तात्काळ विभागीय आयुक्त पुणे व जिल्हा अधिकारी सोलापूर यांना पाठवित असल्याचे सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !