आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात कांग्रेस चे चक्काजाम आंदोलन आंदोलनाच्या भितिने लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना केले बंद

0
आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात कांग्रेस चे चक्काजाम आंदोलन

आंदोलनाच्या भितिने लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना केले बंद

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे 

कांग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे

गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक मेव लोहखनिज प्रकल्प उभारण्यात आला आहे परंतू लोहखनिज बाहेर राज्यात व बाहेर जिल्ह्यात पाठवले जाते आहे. तो लोहखनिज कोनसरी येथील प्रकल्पात साठवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी .व स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तसेच जर बाहेर राज्यात लोहखनिज पाठवले जाते आहे तर सायंकाळी ६ वा ते सकाळी ७ वा.पर्यत ट्रकांना परवानगी देण्यात यावी ,  एटापल्ली येथील शेतकऱ्यांची जे नुकसान होत आहे ती भरपाई द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी नामदेव किरसान, डॉ कोळवते, जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे,प्रमोद भगत, संजय पंदिलवार महिला जिल्हाध्यक्षा सौ रुपाली पंदिलवार, घनश्याम चापले,  यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील सामान्य गोरगरीब जनतेला खोटे आस्वासन दाखवून सुरजागड प्रकल्प सुरू करण्यात आले त्यामुळे वनस्पतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सुरजागड वरुन आवागमण करण्यात ये जा करणाऱ्या गाड्यामुळे वारंवार अपघात होऊन गोरगरीबांचे नाहक जिव जात आहेत त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी व ग्रामीण लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
सदर मागण्या चे निवेदन तहसीलदार चामोर्शी यांना देण्यात आले. या चक्का जाम आंदोलन स जिल्ह्यातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !