राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली तर्फे २१ विद्यार्थिनिंना सायकल वाटप

0
राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली तर्फे २१ विद्यार्थिनिंना सायकल वाटप

अशोक खंडारे/संपादक
वैनगंगा वार्ता 

आष्टी:-दरवर्षी  शासनातर्फे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत ५ किलोमीटरच्या  आतील गावावरून ये-जा करण्याकरिता मुलींना सायकलीचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) येथील 21 विद्यार्थीनिंना सायकली मंजूर झाल्या.त्या सायकलीचे वाटप लाभार्थी विद्यार्थिनिंना आज दिनांक 20.10.2022 रोज गुरूवारला करण्यात आले.  अडपल्ली (माल) ,येथे तुमडी,मलकापूर ,बामनपेठ,मलेझरी ,वसंतपूर ,इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थिनी ये-जा करीत असतात.मंजूर सायकलीचे वाटप लाभार्थी मुलींना  करण्यात आल्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला आहे व त्यांनी आनंद व्यक्त केला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  एन .एस.बोरकुटे,  मलेझरी ,अडपल्ली ,तुमडी,गुंडापल्ली,मलकापूर,सोमनपूर या सहा गावाच्या गटग्रामपंचायत सरपंच तथा शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्या सौ.रेखाताई प्रकाश कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य विजूभाऊ मांदाडे,ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष  अनिल अत्राम , आर.आर.सरकार पाळीप्रमुख , जे.ए.शेख ,एम,बी.भोयर,वाय.व्ही.मडावी , सौ.के.एस. गुंडावार ,डी.एस.नाईकवार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आर.पी.लाकडे यांनी तर आभार एन.डब्लू.शहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  डी.व्ही.गेडाम ,ए.व्ही.बोकडे , प्रकाश मुडपल्लीवार,एल.पी.झाडे, शंकर पिटाले यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !