युवकाची विहीरित उडी घेऊन आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधि प्रवीण तिवाडे
एटापल्ली
तालुक्यातील कोटमी येथिल युवक आकाश सुभाष पातर 22 याने शनिवारिला गावातील विहिरित उड़ी घेऊन आत्महत्या करण्याची घटना उघडीस आली. शनिवारपासून तो गायब होता. त्याचा शोध घेण्यात आला. पन कुठेच आढळून आला नाही.
दोन दिवसांनी म्हणजे सोमवारला दुपारी त्याचा मुत्यूदेह गावकर्याना एका विहिरीत तरंगताना आढळला.पोलिसांच्या मदतीने तो बाहेर काढून मंगळवारला शवविच्छेदनासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला.त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.कोटमी पोलिस तपास करीत आहे
