७ नोव्हेंबरला पिट्टीगुडा येथे लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम
मा.तुकारामजी पवार व कुटुंबीयांचे भव्य आयोजन
गडचांदूर: स्वर्गीय खेमाजी पवार नाईक यांच्या तिसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नंबर एक येथील खेमाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात सात नोव्हेंबर रोज शनिवारला सायंकाळी सहा वाजता लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राची शान असलेली उत्कृष्ट नृत्यांगना दिलखेचक अदानी रसिकांना तृप्त करणाऱ्या गौतमी पाटील यांच्यासह अकरा नृत्यांगनाचा बहारदार लावणी कार्यक्रम रंगणार आहे. दरवर्षी खेमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्य भव्य कार्यक्रमाचे आयोजक श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक दलित मित्र तुकारामजी पवार यांच्या पुढाकारातून हा सोहळा होतो आहे. महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील यांचा संचाचा भव्य लावणी कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पिट्ठीगुडा येथील खेमाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.गौतमी पाटील यांनी आपल्या नृत्यकौशल्याने आणि आकर्षक सादरीकरणाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लावणी कार्यक्रमांना राज्यभरातील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे पिट्ठीगुडा येथे होणारा हा कार्यक्रम परिसरातील नागरिक, युवक आणि कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा दलितमित्र तुकारामजी खेमाजी पवार नाईक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी, लावणीप्रेमींनी आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मा. तुकारामजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. पंकज पवार, श्री स्वप्निल पवार, श्री .बाबुराव पवार व कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

